मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 19 जून 2021 (08:00 IST)

भोपळ्याच्या बिया खूप उपयुक्त आहे ,फायदे जाणून घ्या

भोपळ्याचे नाव ऐकूनच लोक तोंड वाकडे करतात.परंतु भोपळ्यासह त्याच्या बिया देखील खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने मोठे आजार दूर होण्यात मदत मिळते.भोपळ्यात ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात  आढळत.आपल्या दैनंदिन आहारात याचा समावेश करावा.भोपळ्याच्या बिया आयरन,कॅल्शियम,फोलेट,बीटा केरोटीन आणि बी 2 ने समृद्ध आहे.मधूमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन आवर्जून करावे.
चला यापासून मिळणारे फायदे जाणून घेऊ या.
 
1 भोपळ्याच्या बिया ऑक्सिडेटिव्ह कमी करून रक्तातील साखर नियंत्रित करतात. साखरेची पातळी याचे सेवन केल्यामुळे राखली जाते.या बिया आपल्या आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे.
 
2 भोपळ्याच्या बियामध्ये बरीच फायबर आढळतात, ते खाल्ल्याने भूक कमी होते. आणि आपले वजन देखील नियंत्रित राहतात. यासह, अनारोग्यादायी गोष्टी खाण्याची सवय देखील बंद होते.
 
3 भोपळ्याच्या बियामध्ये क्यूक्रबिटासिन आढळते.हा अमिनो ऍसिडचा एक प्रकार आहे.यामुळे केसांची वाढ होते.स्कल्पवर भोपळ्याच्या बियांचे तेल देखील लावू शकता.त्याच बरोबर मूठभर भोपळ्याच्या बियाचे सेवन करा. 
 
4 या मध्ये व्हिटॅमिन ई आणि कॅरोटीनोईड मुबलक प्रमाणात आढळतात  हे सूज मध्ये देखील आराम देखील देते. तसेच पेशींचे संरक्षण देखील  करते.
 
5 या मध्ये मुबलक प्रमाणात वसा ,अँटीऑक्सीडेंट आणि फायबर आढळते.हे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.बियांचे सेवन केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत मिळते.आणि चांगले कोलेस्ट्रॉलला चांगले करते.या मुळे रक्ताभिसरण देखील चांगलं होतं.
 
6 मानसिक तणावामुळे लोकांची झोप व्यवस्थित होतं नाही.वेळेच्या पूर्वीच झोप उघडते.अशा परिस्थितीत भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. या मध्ये असलेले सेरॉटेनिन चांगले असतात या मुळे नैसर्गिक झोप येते.
 
7 महिलांमध्ये संधिवात होणे हे सामान्य बाब आहे. परंतु वेदना जास्त वाढल्यावर मन लागत नाही.भोपळ्याच्या बियांचे तेल लावल्याने सांधेदुखीत आराम मिळतो.