1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: रविवार, 6 जून 2021 (18:14 IST)

घुबडाचे राज्याभिषेक

कावळे आणि घुबड यांच्यातील शत्रुत्व खूप जुने आहे. मानवाने एखाद्या सर्वशक्तिमान माणसाला आपला प्रमुख म्हणून निवडतात,प्राण्यांमध्ये सिंहाला,मास्यांमधुन एका मोठ्या मास्याला, त्याच प्रमाणे पक्ष्यांची देखील एक सभा झाली आणि त्यात त्यांनी आपले प्रमुख निवडायचे ठरविले.

राज्याभिषेकाच्या दोन दिवसांपूर्वी पक्ष्यांनी देखील घुबड आपला राजा असल्याचे दोनदा घोषित केले होते, परंतु अभिषेकाच्या ठीक अगोदर, जेव्हा ते तिसऱ्यांदा घोषणा करणार होते तेव्हा कावळ्यांनी त्यांच्या घोषणेचा निषेध केला आणि असे म्हटले की अशा पक्ष्याला का बरं राजा म्हणून निवडायचे जो फार रागीट स्वभावाचा दिसत आहे.ज्याला बघतातच लोक त्याचा राग करतात.कावळ्याच्या या विरोधाला घुबड सहन करू शकला नाही आणि तो कावळ्याला मारायला धावला.

तेव्हा हे बघून पक्ष्यांनी देखील विचार केला की कावळ्यांचे म्हणणे बरोबर आहे .हा घुबड राजा म्हणून योग्य नाही.म्हणून मग त्यांनी राजा म्हणून हंसाची निवड केली.
तेव्हा पासून कावळा आणि घुबडमध्ये वैर आजतायगत सुरूच आहे.