रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: गुरूवार, 5 सप्टेंबर 2024 (07:00 IST)

साखर ओली होते आहे का? डब्ब्यात ठेवा या 5 वस्तू

sugar
साखरेच्या डब्ब्यात ओलावा निर्माण झाल्यास साखरेला देखील पाणी सुटते. मग साखरेची साठवणूक करणे कठीण जाते. पावसाळ्यात असे होणे सामान्य गोष्ट आहे. पण साखेरला मुंग्या लागून जातात. साखर ओली होत असले तर त्यासाठी काय उपाय करावे आज आपण पाहणार आहोत. 
 
1. कडुलिंबाचे पाने-
कडुलिंबाची पाने नैसर्गिक शोषक आहे, म्हणजे कडुलिंबाची पाने साखरेत ओलावा दूर ठेवण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे साखर कोरडी राहते व मुंग्या लागत नाही. डब्ब्यामध्ये साखर वरती पाच ते सात कडुलिंबाची वाळलेली पाने ठेवावी. ही वाळलेली पाने साखरेतील ओलावा शोषून घेतील. व दर दहा दिवसांनी ही पाने बदलवावी. 
 
2. वाळलेली लिंबाची साल-
एक संत्री किंवा लिंबाचे साल कोरडे म्हणजे वाळवून घ्या. नंतर हे साल साखरेमध्ये ठेवावे. साल अधिक कोरडे झाल्यानंतर साखरेतून काढून घ्या. 
 
3. कोळसा-
कोळसा हा ओलावा शोषून घेणारा एका शक्तिशाली स्रोत आहे. साखरेत ओलावा शोषून घेण्यासाठी कोळसा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. एक कोळसा ब्रीदेबल पॅकेट किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवा. किंवा चीजक्लोथ मध्ये देखील गुंडाळून ठेऊ शकतात. असे केल्याने कोळसा साखरेतील पाणी शोषून घेईल. व प्रत्येक महिन्याला हा कोळसा बदलवून घ्यावा. 
 
4. तांदळाचे दाणे-
एका छोट्याश्या चीजक्लोथ मध्ये तांदूळ ठेऊन हे साखरेत ठेवावे. तसेच ही तांदळाची पिशवी महिन्यातून एकदा बदलून घ्यावी. तांदूळ साखरेतील पाणी शोषून घेतात. 
 
5. मीठ- 
एका छोट्या कपड्यात किंवा चीजक्लोथ मध्ये मीठ भरावे. व साखरेच्या डब्ब्यात ठेवावे. व लक्ष असुद्या की मिठाची चव साखरेला लागायला नको. व महिन्यातून दोनदा हा कापड बदलून घ्या. यामुळे साखरेतील ओलावा कमी होईल. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik