"गृहिणी" आहे हे सांगतांना अजिबात लाजायचं नाही

relation
Last Modified शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (17:02 IST)
"गृहिणी" आहे हे सांगतांना
अजिबात लाजायचं नाही
" घर सांभाळणं " हे काम
वाटतं तेवढं सोप्पं नाही

ती घर सांभाळते म्हणून
बाकीचे relax असतात
आपापल्या क्षेत्रामध्ये
उत्कृष्ट काम करू शकतात

घराघरातली प्रसन्न गृहिणी
पायाचा दगड असते
घराण्याची सुंदर इमारत
तिच्यामुळेच उभी असते

घर सांभाळणाऱ्या गृहिणीला
कधीही कमी लेखू नये
नौकरी करत नाही म्हणून
कोणीच तिला टोकू नये

तिच्या कष्टाचं मोल लावल्यास
पगार देऊ शकणार का ?
इतके काबाड कष्ट आपण
कधी करू शकणार का ?
नौकरी करणाऱ्या स्त्रियांचं
निश्चितच कौतुक आहे
पण समजू नका गृहिणी मध्ये
काहीतरी कमी आहे

खरं सांगा गृहिणी सारखी
कोणती व्यक्ती उदार असते
घरातल्या सर्वांसाठी
जी फुकटात राबत असते

दर महिन्याला पगार मिळतो
म्हणून आपण नौकरी करतो
चोवीस तास राबणाऱ्या
गृहिणीला काय देतो ?

गृहिणीला पॅकेज देण्याची
तुमची माझी श्रीमंती नाही
डॉक्टर , इंजिनियर , बँकर पेक्षा
तिचा हुद्दा कमी नाही
मानधन नाही , सुट्टी नाही
तरीही हसमुख असते " ती "
घराचं घरपण टिकून असतं
जोपर्यंत असते " ती "

गृहिणी आहे हे सांगतांना
मान खाली घालू नका
बाकीच्यांनी तिच्या समोर
मुळीच चरचर बोलू नका

म्हणून म्हणतो गृहिणीचा
आदर आपण केला पाहिजे
अन्नपूर्णा , लक्ष्मीला
पहिला मान दिला पाहिजे

- सोशल मीडिया


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

UPSC Main Exam Preparation Tips: UPSC मुख्य परीक्षेत यश ...

UPSC Main Exam Preparation Tips: UPSC मुख्य परीक्षेत यश मिळवण्यासाठी  कोणत्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत जाणून घ्या
Exam Preparation Strategy: UPSC ने सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षेचे निकाल आधीच ...

Independent Day 2022 Essay स्वातंत्र्य दिन 2022 वर निबंध

Independent Day 2022 Essay स्वातंत्र्य दिन 2022 वर निबंध
भारताच्या राष्ट्रीय सणांपैकी एक म्हणजे आपला स्वातंत्र्यदिन, ज्या दिवशी भारत स्वतंत्र ...

Tips for Routine Makeup : रुटीन मेकअप करण्यासाठी टिप्स

Tips for Routine Makeup : रुटीन मेकअप करण्यासाठी टिप्स
मेकअपकडे एक कला म्हणून बघितले जाते. काही महिला ऑफिसला जातानाही हलकासा मेकअप करणे पसंत ...

Dengue Symptoms डेंग्यूची कारणे ,लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

Dengue Symptoms डेंग्यूची कारणे ,लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
डेंग्यू संसर्ग ही जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये उद्भवणारी एक सामान्य समस्या आहे .

व्यायाम म्हणजे काय? महिलांसाठी घरकाम हा व्यायामाला पर्याय ...

व्यायाम म्हणजे काय? महिलांसाठी घरकाम हा व्यायामाला पर्याय ठरू शकतो?
शारीरिक हालचालींच्या व्यायामात महिला पुरुषांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचं जागतिक आरोग्य ...