Parenting Tips: तुमचं मुलं बिघडत आहे का, या लक्षणांनी ओळखा

Last Updated: शनिवार, 28 मे 2022 (14:59 IST)
पालकांना आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची असते. मुलांच्या आनंदासाठी तो सर्व काही करतो. मुलंही आपल्या आई-वडिलांवर खूप प्रेम करतात आणि त्यांचे म्हणणे ऐकतात. मुलं मोठी झाल्यावर शाळेत किंवा कॉलनीतील मुलांशी मैत्री करतात. आपले मित्र बनवतात. पण बऱ्याच वेळा त्यांना चांगले मित्रांसोबत काही असे माणसे देखील भेटतात ज्यांच्या संपर्कात येऊन मुलं चुकीच्या गोष्टी शिकू लागतात. त्यांच्या वागण्यात बदल होतो. चुकीच्या संगतीमुळे ते लहान वयातच धूम्रपान करू लागतात. त्यांच्या वागण्यात बदल होतो. आपल्या मुलाला नेहमी चांगले शिक्षण मिळावे, त्यांचा सहवास नेहमी चांगल्या माणसांसोबत असावा. असे प्रत्येक पालकाला वाटते. पालकांना नेहमी भीती असते की मुलांची सोबत कशा लोकांशी आहे. ते बिघडणार तर नाही, चुकीचे वागणार तर नाही. आपलं मुलं बिघडत नाही हे या लक्षणांवरून वेळीच ओळखू शकता. जेणे करून मुलं चुकीच्या मार्गावर जाऊ नये.


1 मुलं चुकीची भाषा बोलतात -
मुलांवर आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम लवकर होतो. मुले कधी कधी काही गोष्टी फक्त बघून शिकतात. काहीवेळा ते शिवीगाळ करायला शिकतात. ते चुकीचे शब्द वापरून शिवीगाळ करू लागता. तुम्ही आपल्या मुलाच्या भाषेकडे लक्ष दिले पाहिजे. मुलाच्या बोलण्यात चुकीची भाषा ऐकू येत असल्यास त्याला वेळीच थांबवा. त्याला योग्य आणि चुकीमधील फरक सांगा. आणि ते अशी भाषा कुठून शिकले ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

2 इतरांना त्रास देणे-
अनेक मुलांची सवय असते इतरांना त्रास देण्याची. त्यांना दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद येतो. असं तुमचं मुलं देखील करत असेल तर समजून घ्या की मुलाचे वागणे योग्य नाही.
ही सवय सुधारण्यासाठी मुलाला समजावून सांगा की इतरांना त्रास देणे योग्य नाही. जेणे करून तो आपल्या वागण्यात सुधारणा करेल.

3 मुलांची भांडणे -
कुटुंबात मुलांमध्ये भांडणे होत असतात, पण जर मूल अनेकदा आपल्या मोठ्या भावाला आणि बहिणीला मारत असेल किंवा मारहाण करत असेल, तर त्याशिवाय तो दररोज शेजारच्या मुलांशी भांडत असेल, शाळेतुन त्याच्या तक्रारी येत असेल तर अशा परिस्थितीत तुमचं मुलं बिघडत आहे असं समजावं. त्याच्या अशा वागण्यामागील कारण जाणून घ्या आणि त्याला सुधारण्याचा प्रयत्न करा.

4 चोरी करणे -
मुलांना एखाद्याची चांगली गोष्ट पाहून ती घ्यावीशी वाटते आणि तो कळत नकळत चोरी करू लागतो. आपल्या मुलांनी आपल्या मित्राकडून एखादी वस्तू आणली किंवा घरातून वस्तू किंवा पैसे गायब झाले असल्यास त्याची संगत चांगली नाही. आणि तो चोरी करायला शिकत आहे. त्याचा सहवास कोणाशी आहे याचा तपास करा.

5 हट्टीपणा करणे-
मुलं हट्ट करू लागतात. जर तुमचं मुलं मर्यादेपेक्षा जास्त हट्ट करू लागत असेल आपलं हट्ट पुरवण्यासाठी काही ही करत असेल,उदाहरण -खाणं बंद करणं, रडणे, स्वतःला इजा करणे, या सारख्या गोष्टी करत असल्यास समजावं की मुलाचे वागणे बदलत आहे आणि तो बिघडत आहे. तर वेळीच त्याला समजवावे आणि त्यासाठी कठोर बनावे.यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

Health: वज्रासनात बसल्याने पाय का बधीर होतात, जास्त वेळ या ...

Health: वज्रासनात बसल्याने पाय का बधीर होतात, जास्त वेळ या स्थितीत राहण्यासाठी करा हे उपाय
वज्रासन हे गुडघे टेकण्याची मुद्रा आहे, ज्याचे नाव वज्र या संस्कृत शब्दांवरून आले आहे, ...

"सारांश" || चिंतनीय, वाचनीय, लेखसंग्रह ||

वृत्तपत्र हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. राज्य, देश प्रदेश, जग, यातल्या घडामोडी ...

Breast Tightening सैल स्तन शेप मध्ये येतील, हे योगा करा, ...

Breast Tightening सैल स्तन शेप मध्ये येतील, हे योगा करा, प्रभाव दिसून येईल
सुरकुत्याप्रमाणेच सैल आणि वाकणारे स्तन देखील प्रत्येक स्त्रीच्या शरीरात होणाऱ्या नैसर्गिक ...

Thyroid and Weight थायरॉईडमध्ये वाढते वजन कमी करा, आहारात ...

Thyroid and Weight थायरॉईडमध्ये वाढते वजन कमी करा, आहारात काय सामील करावे काय नाही जाणून घ्या
हायपोथायरॉईडीझमवर उपचार न केल्यास वजन कमी करणे कठीण होऊ शकते, कारण थायरॉईड चयापचय ...

Only 1 exercise for weight loss घरात उभ्या-उभ्या करा 1 ...

Only 1 exercise for weight loss घरात उभ्या-उभ्या करा 1 एक्‍सरसाइज, वजन कमी होईल
काहीवेळा तुम्ही ऑफिसमध्ये, हॉटेलमध्ये किंवा इतर कोठेही अडकता तुम्ही बाहेर पडू शकत नाही ...