काय सांगता लोणीचा वापर असा देखील करता येतो

Last Modified सोमवार, 25 जानेवारी 2021 (18:20 IST)
लोणी ज्याचा वापर आपण आहारात आणि अन्नात करतोच. लहान मुलांना लोणी खूप आवडतं. मुलं तर लोणी तसेच खातात. पण आपल्याला माहीत आहे का की लोण्याचा वापर खाण्याशिवाय बऱ्याच कामांमध्ये करता येतो. लोण्याचा वापर केल्यानं बरेच काम सोपे होतात. बरेच लोक त्वचा चांगली आणि मऊ ठेवण्यासाठी लोणी वापरतात. लोणी जरी गुळगुळीत असले तरी ते दररोजच्या कामात देखील उपयोगी पडतं. कसे काय तर मग जाणून घेऊ या.

1 शेव्हिंग क्रीम म्हणून वापर-
जर आपल्या कडे शेव्हिंग क्रीम नाही तर अशा परिस्थितीत आपण साबणाच्या ऐवजी शेव्हिंग क्रीम वापरा. असं केल्यानं आपल्या त्वचेला ओलावा मिळेल आणि शेव्ह करताना गालाला दुखापत देखील होणार नाही. जर आपण साबण वापरले तर त्वचा रुक्ष आणि कठोर होईल म्हणून शेव्हिंग करताना लोण्याचा वापर करा.

2 बोटातून अंगठी काढण्यासाठी -
बऱ्याच वेळा बोटातून अंगठी काढणे अवघड होत. नेहमी बोटात अंगठी अडकून बसते बरेच प्रयत्न केल्यावर देखील सहजपणे निघत नाही. अशा परिस्थितीत आपण लोणी वापरावे. लोण्याचा वापर केल्यानं आपल्याला त्रास देखील होणार नाही आणि सहजपणे आपली अंगठी बोटातून काढता येईल. या साठी बोटाला लोणी लावा आणि अंगठी हळुवार काढा, जोरात ओढल्यावर आपल्या बोटाला इजा होऊ शकते.

3 चिरलेला कांदा खराब होणार नाही-
बऱ्याच वेळा आपण कांदा चिरल्यावर पूर्ण वापरत नाही. अर्धा कांदा तसाच पडून राहतो आणि त्याला वापरता येत नसल्यानं फेकून द्यावं लागते. आपण देखील असं करत असाल तर असं करू नका. आपल्याकडे लोणी असल्यास या चिरलेल्या अर्ध्या कांद्यावर लोणी लावा आणि फॉईल पेपर मध्ये गुंडाळून ठेवा. कांदा तसाच ताजा मिळेल.

4 दार -खिडक्या गंजल्यावर-
दार आणि खिडक्यांमधून आवाज येत असल्यास किंवा बिजाग्रे खराब झाले असल्यास लोणी वापरा. लोणी गंजलेल्या दार आणि खिडक्यांसाठी गंज प्रतिरोधक तेलाचे काम करतं. म्हणून जर आपल्याला दार खिडक्यांपासून काही अडचण जाणवत असेल तर आपण सहजपणे त्यांच्या वर लोणी लावून द्या. या मुळे दार खिडक्यांना काहीच नुकसान होणार नाही.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

काय सांगता, काकडी मधुमेहासाठी रामबाण आहे

काय सांगता, काकडी मधुमेहासाठी रामबाण आहे
मधुमेह धोकादायक आजार आहे जो चयापचय अनियंत्रित झाल्यामुळे होतो

पालीला पळवून काढण्यासाठी काही सोप्या टिप्स

पालीला पळवून काढण्यासाठी काही सोप्या टिप्स
घरात पाल दिसली की पूर्ण घर त्याला पळवून लावण्यासाठी त्याच्या मागे फिरतं

तेलकट त्वचेसाठी हे फेसपॅक वापरा

तेलकट त्वचेसाठी हे फेसपॅक वापरा
तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यासाठी लोक स्किन केयरच्या नित्यक्रमात अशे उत्पादन जास्त

यशाचे 10 मूळमंत्र जाणून घेऊ या

यशाचे 10 मूळमंत्र जाणून घेऊ या
या गोष्टीना आपल्या आयुष्यात अवलंबवा आणि आयुष्य सोपे करा कारण आयुष्यात यश मिळविण्यासाठी हे ...

विश्रामासन चे फायदे जाणून घ्या तणावापासून मुक्ती मिळवा

विश्रामासन चे फायदे जाणून घ्या तणावापासून मुक्ती मिळवा
हे आसन केल्यानं एखादा व्यक्ती स्वतःला पूर्ण विश्रामाच्यावस्थेत अनुभवतो.