1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

जाडसर कणकेचे लाडू

साहित्य- गव्हाचं रवाळ पीठ ५00 ग्रा., तूप, वेलची पूड, ४00 ग्रा. पिठी साखर, पीठ भिजवण्यापुरतं दूध, २ टे. स्पू.भाजलेली खसखस.
 
कृती- पिठात अर्धी वाटी तुपाचं मोहन घालून  पीठ दुधानं घट्ट भिजवावं.  नंतर त्या पिठाचे मुटके वळून तुपात मंद आचेवर बदामी रंगात तळून घ्यावे. तळलेले मुटके मोडून चाळणीनं चाळून घ्यावे. चाळलेल्या रव्यात पिठीसाखर, वेलची पूड आणि खसखस हे सर्व मिश्रण सारखं करून घ्यावं. वाटीभर तूप गरम करून या मिश्रणावर ओतावं. परत मिश्रण सारखं करून घ्यावं आणि लाडू वळावेत.