शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (12:38 IST)

स्वादिष्ट व पौष्टिक भगरीचे लाडू, अतिशय सोपी कृती

साहित्य: 
१ वाटी भगर
१/२ वाटी पिठी साखर 
वेलची पूड
साजूक तूप 
बेदाणे 
  
कृती: 
भगर स्वच्छ धुऊन वाळवून घ्यावी. नंतर कढईत लाल तांबडा रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यावी. गार झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्यावी नंतर ह्या बारीक मिश्रणात साजूक तूप व पिठी साखर घालून बेदाणे व वेलची पूड घालून लाडू वळून घ्यावे.