शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तूचे हे 5 उपाय करा आणि घरात वाढवा सुख-समृद्धी

घर आणि ऑफिसमध्ये सुख-समृद्धी वाढवण्यासाठी वास्तूत बरेच उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे नकारात्मक ऊर्जेला दूर करून वातावरणाला सकारात्मक बनवू शकता.  
 
वस्तूनुसार पूर्व आणि उत्तर दिशा जास्त ऊर्जावान दिशा आहेत. या दिशांमुळे स्वास्थ्य, समृद्धी आणि रचनात्मक शक्तीचा विकास होतो. लाकडापासून तयार वस्तूंना घर किंवा ऑफिसमध्ये पूर्व दिशेत ठेवणे शुभ असत. येथे आपण जाणून घेऊ वास्तूचे काही अजून उपाय....
 
1. जर तुम्ही घर, ऑफिस किंवा शो-रूमच्या पूर्वी भागात लाकडाचे फर्निचर किंवा लाकडापासून बनलेल्या वस्तू जसे अलमारी, शो पीस, झाड किंवा लाकडाच्या फ्रेमशी निगडित फोटो लावले तर सकारात्मक लाभ मिळू शकतो.
 
2. घर, दुकान किंवा ऑफिसमध्ये सुख शांतीचे वातावरण हवे असेल तर या दिशांमध्ये रोप किंवा लाकडाच्या वस्तू ठेवायला पाहिजे.  
 
3. टोकदार वस्तू जसे कात्री, चाकू इत्यादींची टोकदार बाजू बाहेर असेल असे ठेवणे उत्तम नाही आहे.  
 
4. शयन कक्षात झाड नाही ठेवायला पाहिजे, पण आजारी माणसाच्या खोलीत ताजे फूल ठेवण्यास हरकत नसते. या फुलांना रात्री तेथून दूर करून द्यायला पाहिजे.  
 
5. मानसिक ताणापासून बचाव करण्यासाठी चंदनाची उदबत्ती लावायला पाहिजे. याने ताण कमी होण्यास मदत मिळेल.