शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (23:31 IST)

Kalyan : पैशासाठी जन्मदात्या आईचा निर्घृण खून

murder
कल्याण मध्ये एका कलियुगी मुलाने आपल्या जन्मदात्याआईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व येथे कोळसेवाडी भागातील हनुमान नगर येथे मंगळवारी घडली आहे. एका बेरोजगार मुलाने आपल्या जन्मदात्या आईला पक्षासाठी गळा आवळून खून केला.सरोजा पुमणी असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाला अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या हनुमान नगर येथे प्रभुकुंज सोसायटीमध्ये राहणाऱ्या सरोजा पुमणी आपल्या मुलासह रवी पुमणी राहत होत्या. रवी बेरोजगार असल्याने नेहमी आईकडून पैसे मागायचा. आईने पैसे देण्यास नकार केल्यावर चिडायचा आणि वाटेलतसे बोलायचा.  घटनेच्या दिवशी रात्री दीड वाजेच्या सुमारास आई आणि मुलामध्ये पैशांवरून वाद झाला आणि आईने पैसे देण्यास नकार दिल्यावर रवीने नायलॉनच्या दोरीने आईला बेदम मारहाण केली आणि  गळा आवळला आणि या मध्ये आईचा मृत्यू झाला, हे पाहून त्याने आता आपल्यावर खुनाचा आरोप येईल या पासून वाचण्यासाठी आईच्या मृतदेहाला दोरीच्या साहाय्याने पंख्याला लटकवून आईने गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव रचला. नंतर शेजारी त्याने मी बाजूच्या खोलीत असताना आईने गळफास घेतले सांगितले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी रवीची कसून चौकशी केल्यावर त्यानेच आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी रवी पुमणी च्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवून प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.