शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑगस्ट 2024 (11:03 IST)

त्याला ठार मार, मी जमीन देईन, मणिपूरच्या बीजेपी प्रवक्त्याला जीवे मारण्याची धमकी

Manipur violence
मणिपूरचे भाजपचे प्रवक्ते आणि थाडौ समाजाचे नेते मायकल लामजाथांग हाओपीक यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. दोन डझन लोकांनी चुरन्दपूर मध्ये घराचा काही भाग जाळण्याचा आणि हवेत गोळीबार करण्याचा आरोप आहे. या हल्ल्यांनंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्लेखोर सशस्त्र होते.हाओपिकने एफआयआर मध्ये झालेल्या हल्ल्यासाठी काही लोकांना जबाबदार ठरवले आहे.त्यांनी या प्रकरणात दोन लोकांची नावे उघड केली आहे ज्यांनी काही वॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांना त्यांना ठार मारण्याचे सांगितले होते.या पैकी एकाने हाओपीक यांना ठार मारा मी माझी जमीन देईन असे म्हटले. 

हाओपीक म्हणाले, पोलीस आणि सायबर सेल या नंबरचा तपास करतील.हाओपीक यांना ठार मारण्याची धमकीचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या मध्ये काही जण शस्त्र घेऊन मास्क लावून उभे आहे.या पैकी एकाने म्हटले, लांजाथान्ग कोणाही समुदाया विषयक वक्तव्य दिल्यावर किंवा समुदायाची बदनामी केल्यास तुला ठार मारणार मग तू गुवाहाटीत असो किंवा दिल्लीत.  
Edited by - Priya Dixit