शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (10:07 IST)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाशकात आगमन

भारताचे राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांचे नाशिक येथील ओझर विमानतळावर आज सायंकाळी 07 वाजून 05मिनीटांनी आगमन झाले. त्यांच्यासमवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद उपस्थित होत्या. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मा. राष्ट्रपती महोदयांचे स्वागत केले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, लेफ्टनंट जनरल आर.एस.सलारिया, विभागीय आयुक्त राजाराम माने, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग उपस्थित होते.
 
ओझर विमानतळाहून राष्ट्रपतींचे नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. राष्ट्रपतींचा नाशिक दौरा २ दिवसाचा असल्याने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सुरक्षतेच्या कारणास्तव शासकीय विश्रामगृहचा रस्ता वाहनासाठी तसेच पादचाऱ्यांसाठी बंद असेल .उद्या हवाई दलाला राष्ट्रपती ध्वज म्हणजेच प्रेसिडेंट कलर देऊन सन्मान केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत.उद्या सकाळी ते नाशिक – पुणे महामार्गावरील समारंभाला उपस्थित राहणार आहेत.