शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 25 एप्रिल 2023 (13:00 IST)

Water Metro: पंतप्रधान मोदींनी केले देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन

water metro
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये भारतातील पहिल्या 'वॉटर मेट्रो रेल्वे सेवे'चे उद्घाटन केले. पारंपारिक मेट्रो रेल्वेमध्ये अनेक अडथळे असलेल्या अशा शहरांसाठी ही सेवा अतिशय उपयुक्त मानली जाते.
कोची वॉटर मेट्रो शहराच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. 1,136 कोटी रुपयांचा हा प्रकल्प केरळसाठी एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जात आहे. सार्वजनिक वाहतूक आणि पर्यटनाच्या माध्यमातून शहरातील आर्थिक उपक्रमांना चालना मिळू शकेल. 
 
कोची आणि जवळपासच्या दहा बेटांदरम्यान वॉटर मेट्रो सुरू होत आहे. कोची वॉटर मेट्रो पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल आणि विट्टीला-कक्कनड टर्मिनल दरम्यान सुरू होईल
 
वॉटर मेट्रोवरील प्रवासाचे किमान भाडे 20 रुपये आहे, जे नियमित प्रवासी आहेत, ते बस किंवा लोकल ट्रेनसारखे साप्ताहिक आणि मासिक पास देखील घेऊ शकतात. साप्ताहिक भाडे 180 रुपये असेल, तर मासिक भाडे 600 रुपये असेल, तर तिमाही भाडे 1,500 रुपये असेल. एवढेच नाही तर प्रवाशांना एकच स्मार्ट कार्ड वापरून कोची मेट्रो ट्रेन आणि वॉटर मेट्रोमध्ये प्रवास करता येणार आहे. तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही कोची वन अॅप वापरू शकता.
 
वॉटर मेट्रो म्हणून चालवल्या जाणार्‍या बोटी कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधल्या आहेत. केरळ सरकारने जर्मनीच्या KFW च्या सहकार्याने या प्रकल्पाला निधी दिला आहे. यासाठी सुमारे 1,137 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
 
वॉटर मेट्रो प्रथम 8 इलेक्ट्रिक हायब्रीड बोटींसह सुरू होईल, नंतर त्यांची संख्या वाढविली जाईल.
 
मेट्रो ट्रेनप्रमाणे ती पूर्णपणे वातानुकूलित असेल आणि दररोज 15 मिनिटांच्या अंतराने 12 तास धावेल. सध्या 23 बोटी आणि सुरुवातीला 14 टर्मिनल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मेट्रोमध्ये 50 ते 100 प्रवासी बसू शकतात. 

Edited by - Priya Dixit