दुष्टांचा विनाश करणारी कालरात्री

kaalratri
Last Modified शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (06:27 IST)
दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या साक्षात्कारापासून मिळणार्‍या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते.
या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत.

कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कट्यार) आहे.
कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे

काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे.
मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणार्‍या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे.

काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वाचा साक्षी आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती, शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती.

विश्रांती शिवाय आपण ताजेतवाने होणार तरी कसे. अर्थातच कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

देवपूजा कशी करावी? संपूर्ण माहिती जाणून घ्या

देवपूजा कशी करावी? संपूर्ण माहिती जाणून घ्या
नियम लक्षात घेऊन नित्य देवपूजा केल्याने मन:शांति लाभते. घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण ...

महाभारत काळात हनुमानने केलेल्या पराक्रमाबद्दल जाणून घ्या

महाभारत काळात हनुमानने केलेल्या पराक्रमाबद्दल जाणून घ्या
महाभारत काळात म्हणजेच द्वापर युगात हनुमानाचे अस्तित्व आणि त्यांनी केलेल्या ...

गुरूचरित्र – अध्याय त्रेपन्नावा

गुरूचरित्र – अध्याय त्रेपन्नावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरुदेवदत्तात्रेयचरणारविंदाभ्यां नमः । गुरुर्ब्रह्मा ...

गुरूचरित्र – अध्याय बावन्नावा

गुरूचरित्र – अध्याय बावन्नावा
।। श्रीगणेशाय नमः ।। नामधारक विनवी सिद्धासी । श्रीगुरु निघाले शैल्ययात्रेसी । पुढें ...

कोरोना काळात महात्मा विदुर यांच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा

कोरोना काळात महात्मा विदुर यांच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा
कठीण काळात आपण स्वतःला कशा प्रकारे वाचवू शकतो, या संदर्भात वेद, पुराण, रामायण आणि ...

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...