1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (10:16 IST)

नवरात्र विशेष रेसिपी : हे चवदार पदार्थ करुन तर बघा

नवरात्र म्हटलं की उपवास आलाच. आता आपण आपल्या उपवासाला देखील काही चविष्ट पदार्थ करू शकता. आम्ही आपल्यासाठी खास नवरात्री विशेष अश्या काही रेसिपी घेऊन आलो आहोत-

झणझणीत साबुदाणा वडा: 
साहित्य : 
1/2 कप साबुदाणा, 150 ग्रॅम पनीर(आवडीप्रमाणे), 1 लहान चमचा कुट्टूचं पीठ, 1 मोठा चमचा काजूचे तुकडे, 2 अख्ख्या लाल मिरच्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, सेंधव मीठ चवीपुरती, तळण्यासाठी शेंगदाण्याचं तेल किंवा तूप.
 
कृती : 
सर्वप्रथम साबुदाणा 2 ते 3 पाण्याने धुवून त्याला भिजत ठेऊन त्यातील पाणी निथरुन 1-2 तास ठेवा. आता कोथींबीर, मिरच्या बारीक चिरून घ्या इच्छा असल्यास पनीर कुस्करून घाला. भिजत टाकलेल्या साबुदाण्यात लाल मिर्ची, काजूचे तुकडे, पनीर, सेंधव मीठ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कुट्टूचं पीठ सर्व जिन्नस घालून चांगले मिसळा. आता या मिश्रणाला इच्छित आकार देऊन वड्याचा आकार द्या. 

आता कढईत तेल किंवा तूप गरम करण्यास ठेवा. तेल किंवा तूप गरम झाल्यावर हे वडे तेलात किंवा तुपात सोडा आणि खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्या. तयार झालेले हे वडे हिरव्या चटणी सह सर्व्ह करा.

****

चविष्ट चमचमीत शिंगाड्याची शेव :
साहित्य : 
250 ग्रॅम शिंगाड्याचं पीठ, 200 ग्रॅम राजगिऱ्याचे पीठ, 250 ग्रॅम बटाटे, 2 मोठे चमचे जिरं, 2 चमचे काळी मिरपूड, तेल तळण्यासाठी.
 
कृती : 
सर्वप्रथम बटाटे उकडून कुस्करून घ्या. आता हे दोन्ही पीठ एकत्र करून चाळून घ्या. आता या पिठात 100 ग्रॅम तेल मिसळा, जिरं पूड आणि मिरपूड चाळून घाला. या मध्ये सेंधव मीठ आणि कुस्करलेले बटाटे मिसळून कणिक मळून घ्या आणि तसेच पडू द्या. 15 ते 20 मिनिटानंतर कणिक परत हाताने मळून शेवेच्या साच्यात किंवा झाऱ्यावर चोळून चोळून घासून गरम तेलात खमंग होई पर्यंत तळून घ्या. चविष्ट आणि खमंग खुसखुशीत शेव खाण्यासाठी तयार. आपण ही शेव 9 दिवसा पर्यंत देखील वापरू शकता.