नवरात्र विशेष रेसिपी : हे चवदार पदार्थ करुन तर बघा

Last Modified सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (10:16 IST)
नवरात्र म्हटलं की उपवास आलाच. आता आपण आपल्या उपवासाला देखील काही चविष्ट पदार्थ करू शकता. आम्ही आपल्यासाठी खास नवरात्री विशेष अश्या काही रेसिपी घेऊन आलो आहोत-
झणझणीत साबुदाणा वडा:
साहित्य :
1/2 कप साबुदाणा, 150 ग्रॅम पनीर(आवडीप्रमाणे), 1 लहान चमचा कुट्टूचं पीठ, 1 मोठा चमचा काजूचे तुकडे, 2 अख्ख्या लाल मिरच्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, सेंधव मीठ चवीपुरती, तळण्यासाठी शेंगदाण्याचं तेल किंवा तूप.

कृती :
सर्वप्रथम साबुदाणा 2 ते 3 पाण्याने धुवून त्याला भिजत ठेऊन त्यातील पाणी निथरुन 1-2 तास ठेवा. आता कोथींबीर, मिरच्या बारीक चिरून घ्या इच्छा असल्यास पनीर कुस्करून घाला. भिजत टाकलेल्या साबुदाण्यात लाल मिर्ची, काजूचे तुकडे, पनीर, सेंधव मीठ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कुट्टूचं पीठ सर्व जिन्नस घालून चांगले मिसळा. आता या मिश्रणाला इच्छित आकार देऊन वड्याचा आकार द्या.

आता कढईत तेल किंवा तूप गरम करण्यास ठेवा. तेल किंवा तूप गरम झाल्यावर हे वडे तेलात किंवा तुपात सोडा आणि खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्या. तयार झालेले हे वडे हिरव्या चटणी सह सर्व्ह करा.

****

चविष्ट चमचमीत शिंगाड्याची शेव :
साहित्य :
250 ग्रॅम शिंगाड्याचं पीठ, 200 ग्रॅम राजगिऱ्याचे पीठ, 250 ग्रॅम बटाटे, 2 मोठे चमचे जिरं, 2 चमचे काळी मिरपूड, तेल तळण्यासाठी.
कृती :
सर्वप्रथम बटाटे उकडून कुस्करून घ्या. आता हे दोन्ही पीठ एकत्र करून चाळून घ्या. आता या पिठात 100 ग्रॅम तेल मिसळा, जिरं पूड आणि मिरपूड चाळून घाला. या मध्ये सेंधव मीठ आणि कुस्करलेले बटाटे मिसळून कणिक मळून घ्या आणि तसेच पडू द्या. 15 ते 20 मिनिटानंतर कणिक परत हाताने मळून शेवेच्या साच्यात किंवा झाऱ्यावर चोळून चोळून घासून गरम तेलात खमंग होई पर्यंत तळून घ्या. चविष्ट आणि खमंग खुसखुशीत शेव खाण्यासाठी तयार. आपण ही शेव 9 दिवसा पर्यंत देखील वापरू शकता.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

देव मोठा की गुरू ?

देव मोठा की गुरू ?
एका शिष्याने त्यांना प्रश्न केला, "स्वामीजी, देव श्रेष्ठ की गुरू श्रेष्ठ ?" ते ...

वटपौर्णिमा माहिती, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि संपूर्ण

वटपौर्णिमा माहिती, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि संपूर्ण माहिती
यावर्षी वटपौर्णमेचा हा सण 24 जून रोजी आला आहे. वटपौर्णिमेच्या तिथीचा प्रारंभ हा पहाटे ...

या प्रवासात आपण साधनांतच गुंतत जातो

या प्रवासात आपण साधनांतच गुंतत जातो
पंढरपुरात एक भिक्षुक होता.रोज घरोघरी भिक्षामागुन जीवन जगायचा.त्याला स्वत:चे घर नसल्यामुळे ...

निर्जला एकादशी : सर्व 24 एकादशींचे फळ देणारं व्रत

निर्जला एकादशी : सर्व 24 एकादशींचे फळ देणारं व्रत
एका महिन्यात 2 एकादशी असतात, म्हणजेच आपल्याला एकादशीला महिन्यातून फक्त 2 वेळा व वर्षाच्या ...

गंगा दशहरा महात्म्य, पूजा विधी

गंगा दशहरा महात्म्य, पूजा विधी
गंगा दशहरा हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. या दिवशी आई गंगा पृथ्वीवर आली, ज्येष्ठ शुक्ल ...

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...