पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

pmpml
Last Modified शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (22:15 IST)
पुण्याची ‘लाईफलाईन’ असलेल्या पीएमपीएमएलच्या तब्बल ९ हजार ४९८ कर्मचाऱ्यांना संचालक मंडळाने दिलासा दिला असून त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
'पीएमपीएमएल'च्या ९ हजार ४९८ कामगारांना याचा लाभ होणार असून सातव्या वेतन आयोगापोटी ३२५ कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे. यातील
६० टक्के (१९५ कोटी रुपये) पुणे महापालिका देणार आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ४० टक्के म्हणजे १३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच सातव्या वेतन आयोगाचा निर्णय झाल्याने कर्मचा-यांना सन २०१७-१८ पासूनचा फरक मिळणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

या निर्णयासोबतच पीएमपीएमएल ताफ्यात दोन प्रकारच्या बसेस समाविष्ट करण्यात येणार आहेत. २९ डिसेंबर २०२१ पर्यंत ५०० बसेस घेण्यास संचालक मंडळाच्या बैठकीत परवानगी देण्यात आली. केंद्र सरकारच्या फेर-२ योजनेअंतर्गत १२ मीटरच्या १५० ई-बसेस ६३.९५ रुपये प्रति किलोमीटर दराने भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. यामधील ७५ बसेस २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत, तर उरलेल्या ७५ बसेस २९ डिसेंबर २०२१ पर्यंत रस्त्यावर उतरतील. केंद्र सरकार एका बसला ५५ लाखांचे अनुदान या फेर योजनेंतर्गत देणार असून, त्याचे एकूण ८२ कोटी रुपये मिळणार आहेत, त्यातील १६.५ कोटी रुपये जमा झाले आहेत.

आणखी ३५० इलेक्ट्रिकल बस भाडेतत्त्वावर ६७.४० रुपये प्रति किलोमीटर दराने रस्त्यावरत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातील
७५ बसेस २८ मे २०२१ पर्यंत तर ७५ बसेस २७ जून २०२१ पर्यंत, १०० बसेस
२७ जुलै २०२१ पर्यंत आणि २६ ऑगस्ट २०२१ पर्यंत राहिलेल्या १०० बसेस रस्त्यावर येणार असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यास मदत होणार आहे, असे मोहोळ म्हणाले.



यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर महाराष्ट्र द्वेषी : भाई जगताप

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर महाराष्ट्र द्वेषी : भाई जगताप
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर ...

माणुसकी ओशाळली : रुग्णालयातून लांबवली मृत महिलेच्या ...

माणुसकी ओशाळली : रुग्णालयातून लांबवली मृत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत !
नाशिक शहरातील एका रुग्णालयात माणुकीसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मृत महिला ...

तळेगावात ‘जनसेवा थाळी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

तळेगावात ‘जनसेवा थाळी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
गरीब व गरजू रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे ...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी मुंबईतील जे जे रूग्णालयात कोरोना ...

किंचित दिलासा, राज्यात 58,924 नवे कोरोना रुग्ण

किंचित दिलासा, राज्यात 58,924 नवे कोरोना रुग्ण
राज्यात सोमवारी तब्बल 58 हजार 924 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 351 ...