शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (17:27 IST)

सुमारे 3 हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावणार

एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पहिल्या टप्प्यात निलंबित झालेल्या सुमारे 3 हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळ बडतर्फीची नोटीस बजावणार आहे.
 
निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी महामंडळाने 14 दिवसाची मुदत दिली होती. या मुदतीमध्ये काही कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. तर काही कर्मचाऱ्यांनी या नोटीस इकडे दुर्लक्ष केलं आहे .
 
या सर्व कर्मचाऱ्यांचे बाबतीत पुढील कारवाई म्हणून महामंडळ त्यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात येण्याची शक्यता आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलं नाही आणि दुर्लक्ष केलं त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 
 
वरिष्ठ कार्यालयाकडून स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार आता बडतर्फ करण्याची नोटीस बजावण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना हा मोठा धक्का आहे.