शनिवार, 1 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 6 डिसेंबर 2021 (10:15 IST)

तेरवीला निघालेल्या कुटुंबाचा अपघात

चंद्रपूर तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वाहनाचा पिंपळनेरी खापरी मार्गावर भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या अपघातात मायलेकीचा घटनास्‍त्थळीच मृत्यू झाला. या भिषण अपघातात सायत्रा मोतीराम मेश्राम, कमल चुनारकर या मायलेकीचा घटनास्‍थळी मृत्यू झाला. जखमी अवस्थेत असलेले वडिल मोतीराम मेश्राम यांना उपचारासाठी चंद्रपूरात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वडिलांनी प्राण सोडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.