1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (21:32 IST)

रिल्स बनवून ते इन्स्टाग्रामवर अपलोड केले,एसटी महामंडळाने संबंधित महिला कंडक्टरचे निलंबन केले

st buses
ड्युटीवर असताना रिल्स बनवून ते इन्स्टाग्रामवर अपलोड करणं उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिला कंडक्टरला चांगलचं आंगलट आलं आहे. या प्रकारे व्हिडीओ बनवून एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत एसटी महामंडळाने संबंधित महिला कंडक्टरचे निलंबन केले आहे. मंगल सागर गिरी असं या निलंबित महिला कंडक्टरचे नाव आहे. गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगारात कार्यरत आहेत. याप्रकणी मंगल गिरी या महिला वाहक आणि वाहतूक नियंत्रक कल्याण आत्माराम कुंभार या दोघांना महामंडळाने निलंबित केले आहे.
 
निलंबित महिला कंडक्टर मंगल गिरी यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. गिरी या वेगवेगळ्या गाण्यांवर व्हिडीओ बनवून त्या सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. त्यांच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळतेय. त्यांच्या व्हिडीओंवर आत्तापर्यंत कोणीही आक्षेप घेतला नव्हता. मात्र एसटी महामंडळाची वर्दी घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावर एक व्हि़डीओ बनून ते इन्स्टाग्रामवर अपलोड केले, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओ वरूनचं त्यांच्यावर कारवाई करण्यात आल. या व्हिडिओमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचे सांगत महामंडळाने ही कारवाई केली आहे. तसेच हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकाऱ्यालाही निलंबित करण्यात आलं आहे.

Edited By -Ratandeep Ranshoor