बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (21:27 IST)

मालमत्ता कर थकबाकी 1518245, महापालिकेने मोबाइल टॉवर केले सील

अहमनगर महापालिका हद्दीतील मालमत्तांचा मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून,कारवाईचा बडगा वॉर्ड क्रमांक 42 मधील अक्षय बिल्डिंगवर इंडस टॉवर लिमिटेड या कंपनीची टॉवर मालमत्ता सील कारवाई पूर्ण केली. मालमत्ता कर थकीत असल्याने मोबाईल टॉवर सील करण्याची कारवाई महापालिकेने केली आहे. 29 डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
 
मालमत्ता करा पोटी 15 लाख 18 हजार 245 रूपये थकबाकी होती.कारवाई पथकात, कारवाई प्रभाग अधिकारी सुनील. बी. साठे व प्रभारी कर निरीक्षक एस. के. दगडे व कर्मचारी शाम सुदाम शिंदे, इरफान सय्यद व अशोक गुलदगड यांच्या पथकाने केली.
इत्यादी सहभागी होते केले
वेळोवेळी मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करूनही मालमत्ता धारक कर भारत नाही त्यामुळे अश्या कारवाया कराव्या लागतील असे महापालिकेकडून सांगितले गेले.