राज ठाकरे पुन्हा दिसले विना मास्क

raj thackeray
Last Modified शुक्रवार, 5 मार्च 2021 (22:10 IST)
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा ‘विना मास्क’ आलेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी फुलाचा पुष्पगुच्छ घेऊन आलेले माजी महापौर अशोक मुर्तडक राज ठाकरे यांच्या समोर आले.
यावेळी अशोक मुर्तडक यांनी तोंडावर मास्क घातले होते. राज ठाकरे यांनी मास्क पाहिले आणि अशोक मुर्तडक यांना थेट ‘मास्क काढ’
असे सांगितले. राज ठाकरे यांच्या या कृतीची चर्चा दिवसभर सुरु होती. राज ठाकरे लग्न सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये आले होते.

राज ठाकरे तब्बल सव्वा वर्षानंतर नाशिकमध्ये आल्यानंतर मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी सकाळी हॉटेल एक्सप्रेस इन राज ठाकरेंना भेटायला आलेल्या नेते, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विना मास्क उपस्थिती लावली. विनामास्क असणाऱ्या काही लोकांना हॉटेलच्या बाहेर काढलं. मात्र कोणतीही दंडात्मक कारवाई केली नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

पाकीट चोराला पकडले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. या दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांचे पाकीट चोरणाऱ्या चोराला कार्यकर्त्यांनी चोप दिला तसेच संशयित पाकीट माराला पोलिसांच्या ताब्यात दिले. नाशिकच्या हॉटेल एक्स्प्रेस इन च्या लॉबीत कार्यकर्त्यांचं पॉकीट मारतांना प्रकार उघडकीस आला.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

या बँकांद्वारे ज्येष्ठ नागरिकांना विशेष एफडी व्याज

या बँकांद्वारे ज्येष्ठ नागरिकांना विशेष एफडी व्याज
सीनियर सिटीजन्स स्पेशल एफडी स्कीम मे 2020 मध्ये जाहीर करण्यात आली होती. आधी याची अंतिम ...

‘रुग्णालयात बेड देऊ शकत नाही तर इंजेक्शन देऊन वडिलांना ...

‘रुग्णालयात बेड देऊ शकत नाही तर इंजेक्शन देऊन वडिलांना मारून तरी टाका’
राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या काही केल्या आटोक्यात येत नाही. ...

मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांकडे मागितली मदत लिहिले पत्र; ...

मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांकडे मागितली मदत लिहिले पत्र; कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा
राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी तसेच ...

धक्कादायक ! ‘होम क्वारंटाइन’ असलेल्या तरूण पत्रकाराची ...

धक्कादायक ! ‘होम क्वारंटाइन’ असलेल्या तरूण पत्रकाराची हाताची नस कापून घेत आत्महत्या, वडिलांचा दोनच दिवसांपुर्वी झाला होता कोरोनामुळं मृत्यू
होम क्वारंनटाइन असलेल्या एका तरुण पत्रकाराने हाताची नस कापून घेऊन राहत्या घरी आत्महत्या ...

पुण्यात गरजुंसाठी फक्त 10 रुपयात भोजन थाळी, जाणून घ्या कुठं

पुण्यात गरजुंसाठी फक्त 10 रुपयात भोजन थाळी, जाणून घ्या कुठं
पुण्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारने ...