गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (11:23 IST)

म्हणून दाम्पत्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली

नागपूरच्या उमरखेड येथे आजारपण आणि त्यातून उद्भवलेल्या आर्थिक चणचणीतून एका दाम्पत्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली आहे. राजू सोहनलाल गुप्ता (६०) आणि संध्या राजू गुप्ता (५५) असे या दाम्पत्यांची नावे आहेत. उमरेड बसस्थानक लगत असलेल्या महावैष्णवी कॉम्पलेक्स येथे ते वास्तव्याला होते. राजू गुप्ता यांचे श्री संत जगनाडे महाराज व्यावसायायिक संकुल येथे विजय ट्रेडर्स या नावाने हार्डवेअरचे दुकान आहे.
 
त्यांना एक मुलगा आणि मुलगी असून ‘मुलांनो, आम्हाला माफ करा’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवल्याचीही बाब तपासात उघडकीस आली आहे. मुलगा विक्की काही कामानिमीत्ताने नागपूरला गेला होता. घरी राजू आणि संध्या गुप्ता दोघेही होते. बऱ्याच दिवसांपासून आजारपणामुळे दोघेही त्रस्त होते. यातूनच आर्थिक ताण वाढत गेल्याने दोघांनीही विषारी औषध प्राशन करीत मृत्यूला जवळ केले.