गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 30 डिसेंबर 2019 (16:45 IST)

मंत्रिमंडळ विस्तार: पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत अनुपस्थित

सरकार स्थापनेला जवळपास महिना उलटून गेल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होतोय.
 
मुंबईस्थित विधान भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात शपथ घेणाऱ्या 35 मंत्र्यांची यादी राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
 
29 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
पाहा ताजे अपडेट्स -
2 वाजून 26 मिनिटं
आदिती तटकरे, संजय राठोड, प्राजक्त तनपुरे. बच्चू कडू आणि उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
 
2 वाजून 14 मिनिटं- उद्धव ठाकरे सरकारमधले राज्यमंत्री
काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि विश्वजित कदम, शिवसेनेचे अब्दुल सत्तार, शंभूराजे देसाई यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
2 वाजता- आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री
आमदार म्हणून पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश करणारे आदित्य ठाकरे यांनी पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाचीही जबाबदारी स्वीकारली आहे.
 
आदित्य यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. आदित्य यांना कोणतं खातं मिळणार, ही उत्सुकता आहे.
 
1 वाजून 55 मिनिटं - भगतसिंह कोश्यारींचा संताप
काँग्रेसचे नेते के. सी. पाडवी यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पुन्हा शपथ घ्यायला लावली. अक्कलकुवाचे आमदार असलेल्या पाडवी यांनी शपथ घेताना ठरलेल्या मजकुरासोबतच काही अधिक गोष्टी वाचल्यानं राज्यपालांना राग आला आणि त्यांनी पाडवींना पुन्हा शपथ वाचायला लावली.
 
शिवसेनेचे संदीपान भुमरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब पाटील, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, शिवसेनेचे अनिल परब, उदय सामंत, काँग्रेसचे के.सी.पाडवी, असलम शेख तसंच अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
 
1 वाजून 40 मिनिटं - जितेंद्र आव्हाड, अमित देशमुखांची शपथ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड तसंच काँग्रेसचे नेते अमित देशमुखांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.