रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 13 मे 2020 (16:08 IST)

चिंतेत वाढ, नाशिकमध्ये आणखी १८ पोलिसांना कोरोना

पोलीस दलामध्ये कोरोनाचं वाढतं असून आता नाशिकमध्ये आणखी १८ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. १२८ रिपोर्टपैकी १८ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. 
 
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार देशात कोरोना रूग्णांची संख्या 74 हजारांच्या पुढे गेली आहे. आता एकूण रुग्णांची संख्या 74 हजार 281 झाली असून 2 हजार 415 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 24 हजार 427 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत 921 लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
आतापर्यंत एक हजाराहून अधिक पोलीस महाराष्ट्रात कोरोनाबाधित झाले आहेत. एकट्या मुंबईतच जवळपास 400 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रातील 7 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे.  सध्या हजारो पोलीस क्वारंटाईन आहेत. तर 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पोलिसांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.