बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (07:57 IST)

राज्याचा रिकव्हरी रेट 91 टक्क्यांवर, 51,457 जणांना डिस्चार्ज

राज्यातील कोरोना रुग्णांची दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून, सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, राज्याचा रिकव्हरी रेट 91 टक्क्यांवर पोहोचला आहे. बुधवारी  राज्यात 51 हजार 457 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात बुधवारी 34 हजार 031 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 54 लाख 67 हजार 537 एवढी झाली आहे. त्यापैकी 49 लाख 78 हजार 937 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
सध्या राज्यात 4 लाख 01 हजार 695 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 594 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 84 हजार 371 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.54 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 91.06 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
राज्यात आतापर्यंत 3 कोटी 18 लाख 74 हजार 364 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 17.15 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 30 लाख 59 हजार 095 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 23 हजार 828 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.