रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (08:00 IST)

आरोग्यासाठी फायदेशीर आहे पेरूचे सूप रेसिपी जाणून घ्या

पेरू सूप सर्व वयोगटातील लोक खाऊ शकतात, कारण हे सूप कमी कॅलरीचे आहे.हे सूप बद्धकोष्ठता आणि पोटाच्या पचनासाठी फायदेशीर आहे.हे बनवणे देखील सोपे आहे चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य-
2 पिकलेले पेरू,1/2 चमचा दालचिनी पूड,1/2 चमचा काळीमिरपूड, मीठ, काळेमीठ,पुदिना पाने,साखर चवी प्रमाणे.
 
 
कृती- 
सर्वप्रथम पेरूचे गीर काढून एका भांड्यात उकळवून घ्या.नंतर सर्व साहित्य मिसळून गाळून घ्या.आता हे मिश्रण घट्ट होई पर्यंत शिजवून घ्या.
नंतर हे मिश्रण सूप बाऊलमध्ये काढून घ्या.वरून पुदिनाचे 2-3 पाने घालून सर्व्ह करा.हे सूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
 
टीप- या मध्ये पुदिना घातल्यास याची चव दुप्पट होते.