345 दिवसांची वेलिडिटीसोबत लाँच झाला BSNL चा नवीन प्लान
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने नवीन 1,188 रुपये असणारे प्रीपेड प्लानला सादर केले आहे. या योजनेत लॉग-टर्म वेलिडिटीसोबत काही दुसरे फायदे देखील मिळतील. या नवीन प्लानचे नाव 1,188 Mathuram प्रीपेड वाउचर ठेवण्यात आले आहे आणि याला कंपनीच्या तामिळनाडूच्या वेबसाइटमध्ये लिस्ट करण्यात आले आहे. या नवीन प्लानला प्रमोशनल स्वरूपात 90 दिवसांसाठी आणण्यात आले आहे आणि याची सुरुवात 25 जुलैपासून सुरू झाली आहे.
BSNLचे नवीन 1,188 रुपये असणार्या योजनेबद्दल विस्तारात सांगायचे झाले तर यात ग्राहकांना 5GB डेटा, देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉयस कॉलिंग (दिल्ली आणि मुंबई सामील) आणि 345 दिवसांच्या वेलिडिटीसाठी एकूण 1,200 SMS देण्यात येतील. सध्या या प्लानला तामिळनाडूत सुरू करण्यात आले आहे.
नवीन 1,188 रुपये असणार्याप प्लानमध्ये 5GB डेटाची लिमिट क्रॉस केल्यानंतर ग्राहकांना 25 पैसे प्रति MBच्या दराने चार्ज करण्यात येईल. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे या प्लानला प्रमोशनल म्हणून फक्त 90 दिवसांसाठी लाँच करण्यात आले आहे. अद्याप हे स्पष्ट नाही आहे की कंपनी या प्लानचे विस्तार देशातील दुसर्या भागांमध्ये करणार आहे की नाही.