सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 25 मे 2019 (16:17 IST)

लँडलाइन नंबरने देखील चालवू शकता व्हॉट्‍सऐप, 6 स्टेपमध्ये होईल पूर्ण सेटिंग

वॉट्सऐप चालवण्यासाठी आता नवीन सीम खरेदी करायचा विचार करत असाल तर आधी हे बघून घ्या की तुमच्या लँडलाइन फोन वर इनकमिंग कॉल्स येत आहे की नाही. लँडलाइन काम करत असेल तर लँडलाइन नंबरने देखील तुम्ही वॉट्सऐप सुरू करू शकता. मोबाइलमध्ये एप डाउनलोड करताना वॉट्सऐप बिझनेस एप (WA Business)ची निवड करा, सामान्य वॉट्सऐपवर ही ट्रिक कामी येणार नाही.   
 
हे स्टेप्स फॉलो करा  
 
याला चालवताना लँडलाइन नंबरची आवश्यकता पडेल.   
बिझनेस वॉट्सऐप (WA Business)ला मोबाइलमध्ये डाउनलोड करा.   
वॉट्सऐप इंस्टॉल झाल्यानंतर, हा एप ओटीपी बेस्ड रेजिस्ट्रेशनसाठी नंबर विचारेल.  
कोड (+91) सिलेक्ट केल्यानंतर लँडलाइन नंबरला शहराच्या एसटीडी कोडसोबत लिहावे लागेल. एसटीडी कोड लिहिताना शून्य (0) हटवून द्या. जसे, 0755 शहराचा कोड असेल तर 755 लिहा. लँडलाइन नंबर जाणून घेण्यासाठी एखाद्या मोबाइलवर कॉल करून चेक करू शकता.  
नंबर इंसर्ट केल्यानंतर, हा एप एक ओटीपी पाठवेल. लँडलाइन नंबरमुळे ओटीपी एसएमएस मिळणार नाही. ओटीपी टाइम जाण्याची वाट बघा आणि "कॉल मी'चे निवड  ओटीपी पडताळणीसाठी करा.   
आता लँडलाइनवर कॉल येईल आणि 6 अंकाचा ओटीपी ऐकू येईल. ओटीपी लिहिल्यानंतर वॉट्सऐप याला सत्यापित करेल, आता एप सुरू करण्याची नियमित प्रोसेस फॉलो करा.   
 
हे आहे फायदे
 
लँडलाइन नंबरचा वापर बिझनेस वॉट्सऐपवर करण्याचा फायदा असा आहे की तुम्ही अनोळखी लोकांना आपला मोबाइल नंबर देण्यास वाचता. लँडलाइन नंबरचा वापर करत असाल तर फक्त त्रास असा होईल की कॉन्टॅक्ट लिस्ट मॅनुअली एड करावे लागतील.  
ऑटोमेटेड रिप्लाय सेट करू शकता. बिझनेस एपामध्ये संदेश मॅनेज करण्याचे बरेच विकल्प मिळतात.