बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (09:15 IST)

वाराणसीत मोदींविरोधात पुन्हा एकदा अजय राय

वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसने पुन्हा एकदा अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने दुसऱ्यांदा अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळी त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून अजय रायच उमेदवार होते. त्यावेळी मोदींनी विक्रमी मताधिक्क्याने अजय राय यांचा पराभव केला होता. आम आदमी पार्टीचे संयोजक आणि आताचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुद्धा वाराणसीत मोदींकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्क्याने मोदींनी वाराणसीतून विजय मिळवला होता.