बेस्ट हि नेहमीच माझ्या मनात : उर्मिला मातोंडकर
उत्तर मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आज पोयसर डेपो येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी बेस्ट कामगारांच्या सर्व समस्या उर्मिला मातोंडकरांनी जाणून घेतल्या. यावेळी बेस्ट कामगारांच्या सर्व समस्या उर्मिला मातोंडकरांनी जाणून घेतल्या.
यावेळी, बेस्ट (BEST) ही मुंबईची शान आहे, मुंबईची लाईफ लाईन आहे, तिला जिवंत ठेवलेच पाहिजे, तिला वाचवणे गरजेचे आहे. मी माझ्या शालेय जीवनाचा संपूर्ण प्रवास बेस्टने केलेला आहे. तसेच कॉलेजला ही मी बेस्टनेच जायची त्यामुळे बेस्ट हि नेहमीच माझ्या मनामध्ये आहे. परंतु आज बेस्टची दुर्दशा झालेली आहे, असे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.