सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2019 (17:16 IST)

लोकसभा निवडणुकीत एक दोन नव्हे तर सहा उमेदवार सुभाष वानखेडे

नाव सारखे असल्याने याचा जोरदार फटका किती बसू शकतो, २०१४ च्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात दिसून आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्याच नावाच्या आणखी एका व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रायगडमध्ये सुनील तटकरेंना मतदानावर जोरदार धक्का बसला होता. असाच प्रकार हिंगोली जिल्ह्यात घडला आहे. हिंगोली येथे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या नावाशी सारखेपणा असलेले जवळपास सहा उमेदवार निवडणूक लढवत आहेत.  त्यामुळे सुभाष वानखेडे यांना या नामसाधर्म्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
 
* कोण आहेत हे उमेदवार पुढेवाचा :
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ‘सुभाष बापूराव वानखेडे’ हे आहेत. मात्र, त्यांच्या व्यतिरिक्त 5 ‘सुभाष वानखेडे’ रिगणात आहेत. तर इतर पाच सुभाष वानखेडे – औंढा नागनाथ तालुक्यातील पूर गावाचे अल्पभूधारक शेतकरी, सुभाष विठ्ठलराव वानखेडे – पूर सेनगाव तालुक्यातील सवना गावचे शेतकरी, सुभाष मारोती वानखेडे – उमरखेडतालुक्यातील खरुस गावचे रहिवासी असून, सुभाष परसराम वानखेडे – औंढा नागनाथ तालुक्यातील पूर गावचे रहिवासी आहेत तर शेवटचे सुभाष वानखेडे – उमरखेड तालुक्यातील सुकळी गावचे राहणारे आहेत. त्यामुळे मतदान करतांना मतदार आता गोंधळून जाणार आहे. त्याचा फटका कॉंग्रेसच्या उमेदवाराला बसू शकतो असे चित्र आहे.