बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 30 मार्च 2019 (07:12 IST)

पुण्यातून लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर निवडणूक लढवणार या पक्षाकडून

प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबद्दल स्वतः सुरेखा पुणेकर यांनी संकेत दिले असून, पुण्यातून भाजपाने गिरीश बापट यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यांच्या विरोधात कुणाला उभे करायचे यासंदर्भातला तिढा अजूनही कॉंग्रेस मध्ये सुटला नसून या जागेवरून लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नावाचा विचार होत असल्याची माहिती समोर येते आहे. काँग्रेसने लोकसभेसाठी सुरेखा पुणेकर यांना तिकिट दिल्यास पुण्यात सुरेखा पुणेकर विरूद्ध गिरीश बापट अशी निवडणुकीत लढाईत शक्यता आहे.
 
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुरेखा पुणेकर यांनीच हे सांगितले आहे. मी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या नेत्यांशी बोलले, ते मला त्यांचा निर्णय कळवणार आहे. मात्र दिल्लीत मी कुणाला भेटले त्यांची नावे सांगणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा होती. आता मात्र सुरेखा पुणेकर पुण्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.