गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2019 (15:14 IST)

तेजबहादुर म्हणाला- 50 कोटी द्या मोदींचा जीव घेऊन दाखवीन, वायरल झाला व्हिडिओ

बीएसएफहून निष्कासित जवान तेज बहादूर यादव पीएम नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध वाराणसीतून नामकानं नाकारल्यानंतर एका नवीन वादात अडकताना दिसत आहे. तेज बहादुराचे 2 व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. यात तेज बहादूर म्हणत आहे की 50 कोटी मिळाले तर मोदींचा जीव घेऊन दाखवीन.  
 
एका व्हिडिओत तो दारू पिताना दिसत आहे तर दुसर्‍या व्हिडिओत तो नरेंद्र मोदी यांना 50 कोटी मिळाल्यानंतर फक्त 72 तासास मारण्याची बाब म्हणत आहे.  
 
तेजबहादुरने दारू पिण्याची बाब स्वीकारली आहे पण 50 कोटीत मोदींना मारण्यासंबंधी गोष्टीला षडयंत्र सांगितले आहे. त्याने दावा केला आहे की हे भाजपचे आयटी सेलचे कारस्तान आहे. त्याने सांगितले की लवकरच तो या प्रकरणाची तक्रार नोंदवणार आहे.  
 
भाजपा प्रवक्ता जीवीएल नरसिम्हा राव यांनी वायरल व्हिडिओवर टिप्पणी करत म्हटले आहे की पीएम मोदींच्या विरुद्ध अपक्षाचे असे हिंसक नियोजन बघून आम्ही हैराण आहोत.