विखे-पाटील येत्या 12 एप्रिलला मोदींच्या उपस्थितीत प्रवेश करणार
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील येत्या 12 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नगर येथे भाजपात प्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या काही आमदारांनाही भाजपात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विखे-पाटील त्यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे याही भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता आहे.
पंतप्रधानांच्या उपस्थित विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याने भाजपमध्ये प्रवेश करणे ही प्रतिष्ठेची गोष्ट असल्याने राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह आहे दरम्यान, राहुल गांधींच्या विदर्भातील दोन्ही प्रवार सभांना विखे अनुपस्थित होते, काँग्रेसच्या प्रवारासाठी त्यांनी अजून एकही जाहीर सभा घेतलेली नाही. त्यांच्यावर औरंगाबादची जबाबदारी असताना ते एकदाही तेथे गेलेले नाहीत असे सांगण्यात आले.