गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By

राणे यांचा विषय माझ्या कक्षेत नाही - चंद्रकांत दाद पाटील

भाजपामध्ये लवकरच नारायण राणे प्रवेश करणार आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. यावर आता भाजपातील नेते आपले मत व्यक्त करत आहेत किंवा विषयाला बगल देत आहेत. यावर चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे.

पाटील म्हणाले की राज्यसभा खासदार नारायण राणेत्यांच्या दोन मुलांसह भाजपात येणार असल्याची माहिती आहे  मात्र हा  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, हा विषय माझ्या ताकदीच्या पलिकडे असल्याचं सांगत या विषयाला टाळलं आहे,. राणे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह निर्णय घेण्यास समर्थ  आहेत, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात चंद्रकांत पाटील गणेशोत्सव संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत  बोलत होते.
 
पाटील पुढे म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेला फायदा होईल असाच पक्ष श्रेष्टी आणि मुख्यमंत्री घेतील मात्र शिवसेनेची नारायण राणे यांच्याबाबत काही नाराजी असेल तर या संदर्भात मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. जेव्हा  उद्धव ठाकरे यांच्या ना हरकत देतील तेव्हाच राणेंच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
विधानसभेत भाजप-शिवसेनेची युती होणार हे निश्चित असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपात आले तर त्यांचं स्वागत आहे आणि ते राजे आहेत, ते आले तर अमित शाहांच्या उपस्थितीतच त्यांचा पक्ष प्रवेश होईल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.