गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मे 2019 (18:28 IST)

लोकसभेचा निकाल राज ठाकरे यांची एका शब्दात प्रतिक्रिया

देशात काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुतेक उमेदवार पराभवाच्या छायेत असून, दुसरीकडे  सेना-भाजपाच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी निर्णायक आघाडी घेतली आहे. 
 
 तर राज्यात जोरदार पद्धतीने भाजपा विरोधात  राज ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी सभा घेतल्या तरीही  त्यांच्या उमेदवारांना यश मिळालेलं नाही. त्यानंतर आता राज ठाकरेंनीही सोशल मीडियावर  प्रतिक्रिया दिलीय.
 
 हा  2019 चा लोकसभा निवडणुकीतील निकाल 'अनाकलनीय'  असल्याचं राज ठाकरेंनी ट्विट केले आहे. राज ठाकरेंची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
 
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका राज यांनी केली होती. राज्यभरात सभा घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांचा फारसा परिणाम झाल्याचं दिसलं नाही.
 
 
Raj Thackeray
@RajThackeray
 अनाकलनीय !#Verdict2019
 
2,769
4:39 PM - May 23, 2019
Twitter Ads info and privacy
954 people are talking about this
 
राज यांनी सभा घेतलेल्या जवळपास सगळ्याच मतदारसंघांमध्ये भाजपा आणि शिवसेनेनं जोरदार विजयी दौड केली आहे.