गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 ऑगस्ट 2018 (08:56 IST)

आकाश आणि श्लोका यांचा विवाह त्रियुगी नारायण मंदिरात

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांचा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह देवभूमी उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील त्रियुगी नारायण मंदिरात होणार आहे.  काही दिवसांपूर्वी रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या मंदिराला भेट देऊन तेथे होत असलेल्या वेडिंग डेस्टिनेशनच्या कामाची माहिती घेतली. दरम्यान, उत्तराखंड सरकारही या संधीचा पुरेपूर फायदा उठवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कारण या अंबानी कुटुंबातील शाही विवाहामुळे या स्थळाची प्रसिद्धी सर्वत्र होणार आहे.  
 
 त्रियुगी नारायण मंदिरामध्येच भगवान शिवशंकरांनी देवी पार्वतीसोबत विवाह केला होता. तसेच येथे अखंड जळत असलेल्या धुनीभोवती सप्तपदी घेतली होती, अशी आख्यायिका आहे. या विवाहाच्या काही खुणाही या मंदिरात आहेत. या मंदिरास भेट देणारे भाविक येथील यज्ञकुंडांमध्ये समिधा म्हणून लाकडे अर्पण करत असतात.