गोविंदा डान्स ने उघडले भाग्य मिळाली डान्सर काकांना ही जाहिरात
सोशल मिडीयावर काही महिन्यांपूर्वी डान्सिंग स्टार संजीव श्रीवास्तव यांच्या गोविंदा स्टाईल नृत्याची जोरदार चर्चा झाली, अभिनेता गोविंदा याच्या गाण्यावर गोविंदाप्रमाणेच नाचणाऱ्या संजीव यांनी स्वत: गोविंदा याने तारीफ केली.
संजीव यांच्या नृत्यावर अर्जुन कपूर, अनुष्का शर्मासारखे कलाकार प्रचंड फिदा झाले. रातोरात स्टार झालेल्या मध्य प्रदेशच्या गोविंदा काकांचं नशीब जोरावर आहे. संजीव श्रीवास्तव यांना अमेझॉन कंपनीने एका जाहिरातीमध्ये घेतलं आहे. ग्रेट इंडियन फेस्टिव्हलची अॅमेझॉनची आलेली ही नवी जाहिरात आहे.
या जाहिरातीत संजीव श्रीवास्तव हे तू चीज बडी है मस्त मस्त या गाण्याच्या चालीवर बनवण्यात आलेल्या गाण्यावर नाचताना बघायला मिळत आहेत. त्यामुळे गोविंदला नाही मात्र काकांना गोविंदा स्टाईल नृत्याचा मोठा फायदा होतांना दिसत आहे. त्यांचे नशीब पालटले हे तर नक्कीच.