रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019 (16:58 IST)

पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा शिवसेनेत

पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर अखेर सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. प्रदीप शर्मा आज, शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सायंकाळी ६ वाजता मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शर्मा हे शिवबंधन बांधणार असल्याचे समजते. नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी दिला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.  
 
एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांचा स्वेच्छा सेवानिवृत्ती अर्ज २१ ऑगस्ट २०१९ पासून मंजूर करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील शासन आदेश गृहविभागाचे सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीनिशी राज्य सरकारने जारी केला.  प्रदीप शर्मा यांनी ८ जुलै रोजी पोलीससेवेचा राजीनामा दिला होता. शर्मा यांचा राजीनामा बरोबर ४५ दिवसांनी मंजूर करत गृह विभागाने त्यांना त्यांच्या इच्छेनुसार पोलीस सेवेतून मुक्त केले.