बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated :मुंबई , गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (13:03 IST)

वर्ष २०२० मध्‍ये वाढत्‍या आयटी मागण्‍यांमुळे बेंगळुरू, मुंबई सीबीडींमध्‍ये भाडेतत्त्‍वावरील कार्यालयांमध्‍ये वाढ होण्‍याची अपेक्षा: नाइट फ्रँक

एनसीआरच्‍या सीबीडीमध्‍ये भाडेतत्त्‍वावरील कार्यालयांमधील वाढ स्थिर राहण्‍याची अपेक्षा
 
आगामी २०२० मध्‍ये बेंगळुरू सीबीडीमध्‍ये अधिक पुरवठा होण्‍याची अपेक्षा, मागणी स्थिर राहणार
 
मंद गतीने आर्थिक विकास होत असताना देखील भारतातील कार्यालयीन क्षेत्रामध्‍ये वाढ होण्‍याची अपेक्षा वर्तवली जात आहे. आंतरराष्‍ट्रीय मालमत्ता सल्‍लागार नाइट फ्रँकने नुकतेच सादर करण्‍यात आलेल्‍या आशिया-पॅसिफिक आऊटलुक रिपोर्ट २०१९ अहवालामध्‍ये अंदाज वर्तवला आहे की, वर्ष २०२० मध्‍ये बेंगळुरू व मुंबईच्‍या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्‍ट्समध्‍ये (सीबीडी) भाडेतत्त्‍वावरील कार्यालयाच्‍या प्रमाणामध्‍ये वाढ होईल. तरपेक्ष्‍ज्ञाीय राष्‍ट्रीय राजधानी क्षेत्रामधील (एनसीआर) सीबीडीतील भाडेतत्त्‍वावरील प्रमाणामध्‍ये वाढ स्थिर राहण्‍याची अपेक्षा आहे.
 
बेंगळुरूच्‍या सीबीडीमध्‍ये एमजी रोड, इन्‍फॅन्‍ट्री रोड व रेसिडन्‍सी रोड अशा भागांचा समावेश आहे आणि आयटी क्षेत्र प्रगती करत असल्‍यामुळे या सीबीडीमध्‍ये २०२० मध्‍ये अधिक पुरवठा होण्‍याची अपेक्षा आहे, तर मागणी स्थिर राहण्‍याची अपेक्षा आहे.
 
वर्ष २०२० मध्‍ये आशिया-पॅसिफिक प्रांतामधील ग्रेड-ए कार्यालयीन भाड्यांमध्‍ये ० आणि -३ टक्‍क्‍यांनी घट होण्‍याचा अंदाज आहे. २०१९च्‍या पहिल्‍या नऊ महिन्‍यांमध्‍ये झालेल्‍या ०.६ टक्‍के वाढीपेक्षाही ही घट कमी असेल. व्‍यापाराची मागणी स्थिर राहिल.
 
ऑस्‍ट्रेलियाने गुंतवणूकदारांना आकर्षक गुंतवणूक पर्याय देणे सुरूच ठेवले आहे. ज्‍यामुळे इतर विकसित बाजारपेठांच्‍या तुलनेत त्‍यांचे उत्‍पन्‍न अधिक आहे. वर्ष २०२० मध्‍ये ऑस्‍ट्रेलियन व्‍यावसायिक व औद्योगिक रिअल इस्‍टेट दोन अंकी एकूण परताव्‍यांचे आणखी एक वर्ष पाहण्‍याचा अंदाज आहे. तसेच कमी व्‍याज दरांमुळे भांडवल विकासाला चालना मिळण्‍याचा अंदाज आहे.
 
आशिया-पॅसिफिक ऑफिस रेंट
(२०१९च्‍या तिस-या तिमाहीपर्यंत)

बाजारपेठा शहर स्‍थानिक मापन* प्राइम निव्‍वळ मुख्‍य भाडे २०१९मधील बदलाची टक्‍केवारी* शिल्‍लक पुढील १२ महिन्‍यांसाठीचा अंदाज
भारत बेंगळुरू प्रतिवर्ष प्रति चौरस फूट रूपये 1,615 8.0% 4.0% वाढ
भारत मुंबई प्रतिवर्ष प्रति चौरस फूट रूपये 3,640 1.1% 18.4% वाढ
भारत एनसीआर प्रतिवर्ष प्रति चौरस फूट रूपये 4,079 4.4% 16.4% समान
ऑस्‍ट्रेलिया ब्रिस्बेन प्रतिवर्ष प्रति चौरस मीटर एयूडी 613.0 2.2% 9.6% वाढ
ऑस्‍ट्रेलिया मेलबर्न प्रतिवर्ष प्रति चौरस मीटर एयूडी 694.0  8.8% 2.2% वाढ
ऑस्‍ट्रेलिया पर्थ प्रतिवर्ष प्रति चौरस मीटर एयूडी 610.0 3.2% 14.8% वाढ
ऑस्‍ट्रेलिया सिडनी प्रतिवर्ष प्रति चौरस मीटर एयूडी 1,165 4.9% 3.0% वाढ
पूर्व आशिया टोकियो प्रति महिना प्रति त्‍सुबो जेपीवाय 39,624 0.4% 0.6% समान
पूर्व आशिया बीजिंग प्रति महिना प्रति चौरस मीटर सीएनवाय 360 -3.6% 10.1% घट
पूर्व आशिया गुआंगझोउ प्रति महिना प्रति चौरस मीटर सीएनवाय 193.4 0.4% 8.0% समान
पूर्व आशिया शांघाय प्रति महिना प्रति चौरस मीटर सीएनवाय 282.9 -4.1% 12.1% घट
पूर्व आशिया हाँगकाँग प्रति महिना प्रति चौरस फूट एचकेडी 150.5 -8.1% 3.9% घट
पूर्व आशिया तैपेई प्रति महिना प्रति पिंग टीडब्‍ल्‍यूडी 2,788 2.0% 5.5% वाढ
पूर्व आशिया सेऊल प्रति महिना प्रति चौरस मीटर केआरडब्‍ल्‍यू 33,816.6 0.1% 9.7% समान
आसियान नोम पेन प्रति महिना प्रति चौरस मीटर यूएसडी 23.6  0.5% 12.4% समान
आसियान जकार्ता प्रतिवर्ष प्रति चौरस मीटर आयडीआर 4,200,624 0.0% 23.0% समान
आसियान क्वालालंपुर प्रति महिना प्रति चौरस फूट एमवायआर 5.9 1.5% 22.5% घट
आसियान सिंगापूर प्रति महिना प्रति चौरस फूट एसजीडी 10.35 1.9% 9.9% वाढ
आसियान बँकॉक प्रतिमहिना प्रति चौरस मीटर टीएचबी 1,129 4.7% 8.1% समान
आसियान मनिला प्रतिमहिना प्रति चौरस मीटर पीएचपी 1,095 5.1% 8.0% घट
चीन, भारत, कोरिया, तैवान व थायलंड (एकूण) व्‍यतिरिक्‍त निव्‍वळ मजला क्षेत्रांवर आधारित *१ जानेवारी २०१९ ते ३० सप्‍टेंबर २०१९** इन्‍सेन्टिव्‍हज, सेवा शुल्‍क व कर समाविष्‍ट. निव्‍वळ मजा क्षेत्रांवर आधारित. स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च
 
नाइट फ्रँक आशिया-पॅसिफिक प्राइम ऑफिस रेंटल इंडेक्‍स क्‍यू३ २०१९च्‍या मते भाड्यामध्‍ये १७.६ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह बेंगळुरूची सीबीडी ही २०१९च्‍या तिस-या तिमाहीमध्‍ये आशिया पॅसिफिकमधील सर्वोत्तम कामगिरी करणारी बाजारपेठ ठरली. राष्‍ट्रीय राजधानी क्षेत्रामधील (एनसीआर) कॅनॉट प्‍लेस आणि मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स (बीकेसी) येथील सीबीडी २०१९च्‍या तिस-या तिमाहीमध्‍ये वर्षानुवर्षे अनुक्रमे ४.४ टक्‍के व २ टक्‍के भाडेवाढीसह आशिया-पॅसिफिक प्रांतामधील ७वी आणि ११वी जलदगतीने विकसित होणा-या प्राइम कार्यालयीन बाजारपेठ ठरल्‍या.
 
''२०१९ मध्‍ये मंद अर्थव्‍यवस्‍था असताना देखील आयटी क्षेत्रातील जलद विस्‍तारीकरणामुळे मुंबई, एनसीआर व बेंगळुरू सारख्‍या शहरांमधील कार्यालयीन क्षेत्रांमधील भाडेवाढ चांगली आहे. विशेषत: बेंगळुरूमध्‍ये प्रतिभावान कर्मचारीवर्गाची उपलब्‍धता आणि कमी भाड्यांमध्‍ये नवीन कार्यालयासाठी जागा उपलब्‍ध होत असल्‍यामुळे बहुराष्‍ट्रीय कंपन्‍या प्रबळपणे विकसित होत आहेत. आम्‍ही या बाजारपेठांसाठी ट्रेण्‍डमध्‍ये वाढ होण्‍याची अपेक्षा करतो. तसेच वर्ष २०२० मध्‍ये कार्यालयीन क्षेत्रासाठी मागणीमध्‍ये वाढ होण्‍याची देखील अपेक्षा आहे,'' असे नाइट फ्रँक इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक शिशिर बैजल म्‍हणाले.
 
नुकतेच करण्‍यात आलेल्‍या नाइट फ्रँक-फिकी-एनएआरईडीसीओ- ‘रिअल इस्टेट सेंटीमेंट इंडेक्स क्‍यू३ २०१९’ अहवालामध्‍ये बहुतांश रिअल इस्‍टेट भागधारकांनी (८२ टक्‍के) कार्यालयीन क्षेत्रासाठी आशावादी चित्र निर्माण होण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे. पुढील सहा महिन्‍यांसाठी कार्यालयीन क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात जागा मिळण्‍याबाबत ते सकारात्‍मक आहेत. रिअल इस्‍टेट भागधारकांना पुढील सहा महिन्‍यांमध्‍ये ग्रेड ए कार्यालयीन क्षेत्रांसाठी देखील जागा भाडेतत्त्‍वावर देण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये वाढ होण्‍याची अपेक्षा आहे.