गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मे 2019 (09:35 IST)

वोडाफोनच्या प्रीप्रेड ग्राहकांना घरपोच 4G सिम मिळणार

वोडफोन कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रीप्रेड ग्राहकांना त्यांच्या घरपोच 4G सिम पोहचवण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा फक्त नव्याने घेतलेल्या प्रीप्रेड ग्राहकांसाठी असणार आहे. ग्राहकाला या सुविधेसाठी कंपनीच्या वेबसाईटवरुन 249 रुपयांचा एक रिचार्ज करावा लागेल. ग्राहकाला इतर कंपनीमधून वोडाफोनमध्ये नंबर पोर्ट करायचा असेल, तरी देखील त्याला ही सुविधा मिळणार आहे.
 
या प्लॅनची वैधता 28 दिवसांठी असेल. या प्लॅनमध्ये ग्राहकाला दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. ग्राहकांना लोकल, एसटीडी आणि रोमिंग अनलिमिटेड कॉलिंग मोफत मिळणार आहे. सोबतच दररोज 100 मेसेज देखील या प्लॅनमध्ये मिळतील. जर वोडाफोनचे नवीन ग्राहक असाल आणि आपला नंबर जर वोडाफोनमध्ये पोर्ट करणार असाल तर आपल्याला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तिथेचं नव्या नंबरसाठी आणि नंबर पोर्ट करण्याची रिक्वेस्ट टाकावी लागेल. 4 दिवसानंतर 4G सिम कार्ड आपल्या घरी पोहचवण्यात येईल. वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर ग्राहकाकडून वैयक्तिक माहिती मागितली जाईल