गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

नागराज मंजुळे यांच्या ‘द सायलेन्स’ चे पोस्टर रिलीज

मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे आता नव्या सिनेमावर काम करत आहे. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या ‘द सायलेन्स’ चित्रपटात नागराज मंजुळे महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. नागराजच्या या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे.
 
या सिनेमात नागराज मंजुळेसोबतच अभिनेत्री अंजली पाटील आणि अभिनेता रघुवीर यादव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सत्य कथेवर आधारित हा सिनेमा येत्या 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची कथा आणि पटकथा अनिता सिधवानीने लिहिली आहे.