गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑक्टोबर 2018 (08:14 IST)

नैसर्गिक प्रसूतीद्वारे झालेले बाळ अधिक निरोगी

सिझेरियन प्रसूतीपेक्षा नैसर्गिक प्रसूतीद्वारे झालेले बाळ अधिक निरोगी असते. तसेच सिझेरियन प्रसूतीचा दुष्परिणाम केवळ बाळावरच नव्हे तर आईवरही होतो, असा निष्क र्ष नवीन संशोधनाद्वारे समोर आला आहे. हा निष्कर्ष जागतिक स्तरावर वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या ‘लॅन्सेट’या नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक प्रसूतीच होणे फायद्याचे असल्याचे अधोरेखित होत आहे.
 
या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार सिझेरियन जरी त्या काळापुरती वैद्यकीयदृष्ट्या जीवन वाचवणारी पद्धती असली तरी त्याचे तात्पुरते आणि दीर्घकालीन परिणाम होतात. यामध्ये बाळाच्या नाळेत दोष निर्माण होणे, गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा होणे, मृत बालक जन्मणे, महिने पूर्ण होण्याआधीच होणारा जन्म असे दुष्परिणाम होऊ शकतात, असे या नियतकालिकात म्हटले आहे.