रेकॉर्ड प्लेसमेंट प्रपोजल, फेसबुककडून तब्बल १.४५ कोटीचे पॅकेज
दिल्ली सरकारच्या इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) मधील एका विद्यार्थीनीला फेसबुककडून नोकरीसाठी तब्बल १.४५ कोटी रुपये पॅकेजची ऑफर मिळाली आहे. या वार्षिक पॅकेजचा प्रस्ताव कँप्यूटर सायन्स इंजिनिअरींग करणाऱ्या महिला विद्यार्थीनीला दिला आहे. दिल्ली सरकारच्या या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थीनीला मिळालेले आतापर्यंतचे हे रेकॉर्ड प्लेसमेंट प्रपोजल आहे.
याशिवाय अन्य दोन विद्यार्थ्यांना अनुक्रमे ४३ लाख आणि ३३ लाख रुपयांच्या पॅकेजची ऑफर कंपन्यांनी दिली आहे. यावेळी २०२० मध्ये ग्रॅज्यूएशन पूर्ण करणाऱ्या ३१० विद्यार्थ्यांना कंपन्यांकडून नोकरीचे प्रस्ताव मिळाले आहेत. तर २५२ विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची ऑफर मिळाली आहे. दिल्ली सरकारच्या आयआयआयटीमधील विद्यार्थ्यांना आतापर्यंत सरासरी पॅकेज १६.३३ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहेत. यामध्ये गुगल, ॲमेझॉन, फेसबुक, क्वालकॉम, सॅमसंग, रिलायन्स, डब्ल्यूडीसी, टायर रिसर्च अशा अनेक कंपन्यांचा सहभागी झाल्या.