तुमच्या पत्रिकेत शनी दोष आहे का, हे कसे ओळखाल ?
शनी एका घरातून दुसर्याद घरात जातो तेव्हा लोकांमध्ये भीती निर्माण होते. शनीचा कोप काहीतरी वाईट घडविण्यास भाग पाडतो, अशी समजूत आहे. शनीची प्रतिकूल अवस्था आमच्या रोजच्या दिनचर्येलासुद्धा प्रभावित करते. त्यासाठी शनी आपल्या पत्रिकेत प्रतिकूल तर नाही ना! हे पाहणे गरजेचे आहे. शनी आपल्या पत्रिकेत आहे की नाही हे ओळखण्यासाठी खालील कसोटी अवलंबा.
1 शरीरात नेहमी थकवा व आळस असेल तर
2 अंघोळ करण्याचा कंटाळा येत असेल किंवा अंघोळ करण्यासाठी वेळच नाही मिळत
3 नवीन वस्त्रांची खरेदी किंवा घालायची संधीच मिळत नसेल तर
4 नवीन वस्त्र किंवा जोडे लवकर लवकर फाटायला लागले तर
5 घरात तेल, मोहरी किंवा डाळींची सांडलवंड किंवा नुकसान होत असेल तर.
6 कपाट अव्यवस्थित ठेवले जात असेल तर
7 जेवण करण्याची इच्छा होत नसेल
8 डोक व कमरेत वेदना सुरू झाल्यास
9 घरात वडिलांसोबत मतभेद वाढायला लागल्यास
10 अभ्यास करण्याची व लोकांना भेटायची इच्छा होत नसल्यास
11. विनाकारण चिडचिड होत असल्यास
वर दिलेली लक्षणे जाणवत असल्यास आपल्या पत्रिकेत शनी दोष आहे हे समजावे. तो दूर करण्यासाठी खालील उपाय करावेत.
तेल, मोहरी, उडदाच्या डाळीचे दान करावे. पिंपळाच्या झाडाला पाणी घालून दिवा लावावा. मारुती व सूर्याची आराधना करावी, मांस-मद्य यांचा त्याग करावा, गरीबांना मदत करावी, काळ्या रंगांचे वस्त्र घालणे टाळावे, पण काळ्या वस्तूंचे दान जरूर करावे.