गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Foods to Avoid with Milk दुधासोबत चुकूनही हे पदार्थ खाऊ नका, आरोग्य धोक्यात येईल

milk
Foods to Avoid with Milk दुधाची गणना नेहमीच आरोग्यदायी आहारात केली जाते. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम असे अनेक पौष्टिक घटक असतात. हे सुपरफूड म्हणून ओळखले जाते. दूध हे प्रौढ आणि लहान मुलांसाठी सर्वांसाठी खूप फायदेशीर आहे. दूध देखील एक उत्तम पूरक आहे, निरोगी राहण्यासाठी दररोज कोमट दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, दुधासोबत काही गोष्टींचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. चला जाणून घेऊया त्या गोष्टी ज्या दुधासोबत खाऊ नयेत...
 
दुधासोबत हे पदार्थ खाणे टाळा
फिश
दूधाची प्रकृती गार असते आणि फिशची गरम. अशात हे सोबत खाल्ल्याने अनेक प्रकाराच्या समस्या होऊ शकतात. दुधासोबत मासे आणि इतर मांसाहारी पदार्थ कधीही खाऊ नयेत. यामुळे तुम्हाला पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
 
केळी
तुम्ही ऐकले असेल की दूध आणि केळी एकत्र खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते, पण ते पचायला खूप वेळ लागतो. ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी केळी आणि दूध एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
 
दही
दही दुधापासून बनते आणि आयुर्वेदानुसार दही दुधासोबत खाऊ नये. हे मिश्रण आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि तुमचे पोटही खराब होऊ शकते.
 
आंबट पदार्थ
दुधात मिसळून आंबट पदार्थ कधीही खाऊ नका. दुधासोबत व्हिटॅमिन सी युक्त फळांचे सेवन करणे देखील टाळावे, कारण जर तुम्ही आंबट फळे दुधासोबत खाण्याचा पर्याय निवडला तर तुम्हाला गॅस आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता असते. याशिवाय सर्दी, पुरळ आणि अॅलर्जीही होऊ शकते.
 
सॉल्टेड स्नॅक्स
चिप्स आणि सॉल्टेड स्नॅक्स यासह दुधाचे सेवन करु नये कारण यात मिठाचे प्रमाण अधिक असल्याने हे शरीरात इलेक्ट्रोलाइट बँलेंस मध्ये व्यत्यय आणू शकते.
 
प्रथिने समृद्ध अन्न
दुधात प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे. असे केल्याने तुमच्या पचनक्रियेवर ताण वाढू शकतो. पचनाशी संबंधित समस्या देखील होऊ शकतात.