गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

Burned Tongue जीभ भाजली? सोपे उपाय करा लगेच आराम मिळेल

Burned Tongue गरमागरम पदार्थ खाणे खूप आनंददायक आहे, परंतु कधीकधी गरम खाण्याच्या किंवा पिण्याच्या नादात जीभ भाजते. असे झाल्यास केवळ अस्वस्थच वाटत नाही, तर इतर कोणत्याही पदार्थाची चवही येत ​​नाही. जरी ही एक गंभीर समस्या नाही तरी हे बरं होण्यासाठी एक-दोन दिवस लागतात, पण जर तुम्हाला त्याचा त्रास जास्त होत असेल तर येथे दिलेल्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही बऱ्याच अंशी आराम मिळवू शकता.
 
दही - जीभ जळत असल्यास दही खाणे फायदेशीर आहे. याच्या थंडावाने आराम मिळतो, म्हणून जेव्हा जेव्हा भाजते तेव्हा फक्त एक चमचा दही घ्या आणि काही वेळ तोंडात ठेवा.
 
बेकिंग सोडा- चिमूटभर बेकिंग सोडा अनेक समस्यांवर इलाज आहे. त्याच्या एल्काइन नेचरमुळे जीभेच्या जळजळीपासून खूप आराम मिळतो. यासाठी बेकिंग सोडा पाण्यात विरघळवून घ्या आणि त्या पाण्याने गुळण्या करा.
 
साखर- जीभेच्या जळजळीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी चिमूटभर साखर देखील खूप प्रभावी आहे. तोंडात साखर घाला आणि ती स्वतःच विरघळू द्या. पाणी पिण्याची गरज नाही. असे केल्याने जळजळ आणि वेदनांपासून खूप आराम मिळेल.
 
मध- जीभ भाजल्यावर मध चाटल्याने आराम होतो.
 
एलोवेरा जेल- कोरफडीच्या वापरामुळे जीभेच्या जळजळीपासून त्वरित आराम मिळतो. त्याचे जेल कूलिंग इफेक्ट प्रदान करते. एलोवेरा जेलचे बर्फाचे क्यूब्ज तयार करुन वापरा. हे अनेक समस्यांवर प्रभावी आहे. 
 
सात्विक आहार घ्या- जीभ भाजली असल्यास शक्य तितके साधे अन्न खा. खूप मसालेदार अन्न टाळा. साधे अन्न पोट थंड ठेवते त्यामुळे जीभ लवकर बरी होते.
 
आइस क्यूब - जळलेल्या जिभेला आराम देण्यासाठी बर्फाचे तुकडे देखील एक प्रभावी उपाय आहे. जास्त काही नाही, फक्त बर्फाचा तुकडा चोख. लक्षात ठेवा की प्रथम सामान्य पाण्याने बर्फ हलके ओले करा. हे बर्फ जिभेवर चिकटण्यापासून रोखेल.