गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Updated : सोमवार, 29 जुलै 2024 (13:27 IST)

पंचतंत्र कहाणी : चतुर उंदीर

kids story
एक उंदीर होता. तो रस्त्यावरून जात होता. त्याला कापडाचा एक तुकडा मिळाला. तो त्या कापडाच्या तुकड्याला घेऊन पुढे निघाला. त्याने वाटेत एक टेलरच्या दुकान पहिली व त्याला एक भन्नाट कल्पना सुचली. उंदीर कापड घेऊन टेलरकडे गेला. व त्यांच्यामध्ये संवाद झाला. 
 
उंदीर : टेलर ओ टेलर, या कापडाची टोपी शिवून द्या.
टेलर : हे कोण बोलत आहे?
उंदीर : मी उंदीर बोलत आहे. या कपड्याची एक टोपी शिवून द्या.
टेलर : चल… जा इथून. निघ नाहीतर कात्री मारेल तुला.
उंदीर : तू मला घाबरवत आहेस का? तू जर माला टोपी शिवून दिली नाहीस तर मी राजाकडे जाईल आणि तुला शिपाई मग खूप शिक्षा देतील. हे ऐकून टेलर घाबरला व त्याने पटकन टोपी शिवून दिली.
टोपी घालून उंदीर पुढे निघाला. रस्त्यामध्ये उंदराला एक नक्षिकाम करणारा कारागीर दिसला. व उंदीरमामाला टोपीवर नक्षी काढावीशी वाटली. 
उंदीर : दादा,माझ्या टोपीवर नक्षीकाम काढून द्या. 
कारागीर : नक्षीकाम करणार्याने उंदीरकडे पाहिले. मग तो म्हणाला की, तू या मला वेळ नाही.
उंदीर : आता उंदीरमामाला राग आला व म्हणाला की तू सुद्धा मला पळवात आहे का? मी राजाकडे जाईल तुला शिपाई पकडतील व खूप शिक्षा देतील. मग मी मज्जा बघेल.
हे ऐकून नक्षीकाम करणारा कारागीर घाबरला व त्याने ऊंदीरमामाच्या टोपीवर सुरेख नक्षी काढून दिली. आनंदित होऊन उंदीरमामा टोपी घालून नाचत नाचत आपल्या घराकडे गेला.
 
तात्पर्य : जीवनात कधीही कोणाला कमी लेखू नये. 
Edited By- Dhanashri Naik