शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (14:57 IST)

अंबरनाथच्या आनंदनगर MIDC मध्ये रासायनिक गॅस गळतीमुले 20 जण अस्वस्थ रुग्णालयात उपचार सुरु

अंबरनाथच्या आनंदनगर MIDC मधील आर. के. रसायन कंपनीत सकाळी गॅस गळती झाली या गॅस गळतीमुळे शेजारच्या प्रेसफिट नावाच्या कंपनीतील 18 ते 20 कामगारांना त्रास झाला.त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केले आहे.

अंबरनाथतील आनंदनगर MIDC मधील आर.के.केमिकल नावाची कंपनी असून त्यात सल्फ्युरिक ऍसिडवर डिस्टिलेशन प्रक्रिया केली जाते.दररोज प्रमाणे कंपनीत डिस्टिलेशन प्रक्रिया सुरु होती दरम्यान प्लांट मधील एक पाईप निसटून त्यातील गॅस हवेत पसरला आणि शेजारीच असलेल्या एका प्रेसफिट नावाच्या कंपनीत शिरला त्यामुळे तिथे काम करत असलेल्या काही कामगारांना उलट्या होऊ लागल्या तसेच जीव गुदमरणे , मळमळ सारखे त्रास होऊ लागले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असताना त्यांच्या वर उपचार सुरु आहे. 

घटनेची माहिती मिळतातच अग्निशमन दल, पोलीस आणि MIDC अधिकारी घटनेस्थळी पोहोचले कंपनीच्या संघटनेचे ऍडिशनल अंबरनाथ मेन्यूफेक्चर्स असोसियेशन चे  अध्यक्ष उमेश तावडे यांनी कंपनीच्या निष्काळजीपणा मुळे ही घटना घडल्याची कबुली दिली. कंपनीवर योग्यरीत्या कारवाई करण्याचे निर्देश पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली.